सुरेख लेखमालिकेतला आणखी एक सुरेख लेख. आभार कितीदा मानायचे.
मराठीत किंवा कुठल्याही भाषेत कवितेच्या एखाद्या ओळीवर आधारित पुस्तकांची शीर्षके देण्याची टूम, फॅशन काही नवीन नाही. 'अजुनी चालतेचि वाट' हे आनंदीबाई विजापुरे ह्यांचे आत्मचरित्र त्याचे एक उदाहरण. 'आहे मनोहर तरी' हे सुनीताबाई देशपांडेचे तर आत्मचरित्र प्रसिद्ध आहेच. अशीच आणखी शीर्षके आठवतात का बघा बरे?