तुमच्या दृष्टीनी दिग्गज असलेल्या व्यक्तींनी सांगीतलेला अर्थ

यात कुत्सित अर्थ जाणवतो. तुमच्या दृष्टीने म्हणजे दिग्गज व्यक्तीने सांगितलेला अर्थ कसा चुकीचा आहे आणि मी कसा योग्य अर्थ सांगणार आहे असा काहीसा अभिप्राय आपल्या वाक्यातून जाणवतोय.  एक गोष्ट सांगतो.

एका मराठी मंत्र्याचा इंदिरा गांधींनी मंत्रीमंडळात समावेश केला आणि त्याला एक खाते दिले. तो इंदिरा गांधींना म्हणाला "मला या खात्याचा फारसा अनुभव नाही. " त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या "तुम्ही कुठलाही निर्णय घेतलात तरी काही फरक पडणार नाही असेच खाते तुम्हाला दिले आहे."

त्याच धर्तीवर असे म्हणावेसे वाटते "तुम्ही कुठलाही अर्थ सांगितलात तरी मला फरक पडणार नाही. कारण माझ्या दृष्टीने दिग्गज असलेल्या व्यक्तीने योग्य अर्थच सांगितला आहे असा माझा विश्वास आहे."

विनायक