चित्त,
तळटीपेच्या पहिल्या ओळीत एखादा शब्द सुटलाय का? कविला एखादे मुक्तक लिहायचे असल्यास,  असे हवे होते का ?
नवा साहित्य-प्रकार अनोखा वाटला, पण असा प्रयोग करण्यामागे त्यावेळेच्या कविचे साहित्यीक प्रयोजन काय असावे, ह्यावर कृपया सांगणे. म्हणजे गझल+नज्म असे जे केले आहे ते!
मेंदूतील फुलपाखरू ही कल्पना आशयाचे अनेक छटा दाखवून गेली, सुरेख आणि नवकवितेच्या जवळ जाणारी आहे. जनरली आपण मनातले फुलपाखरू म्हणतो.
गल्लाभरू हा शेर फार सणसणीत आहे, (सर्व मालिका लेखकांनी एकदा वाचावा).
नज्म भागात-
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू.... बढिया! (मला 'मलमली तारुण्य माझे' ही रचना आठवली)
ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)... वा वा वा.. खरंच
(एका शेरात 'अश्रू' असे चुकून झालेय.)
-मानस६