मला प्रत्यक्ष आयुष्यातही दोन्ही प्रकारचे अनुभव आलेत.
१. ताई/माई/काकू/मावशी/आजी/जी/काका /दादा इ. संबोधन लावल्याने सुखावणारी मंडळी. आणि तसे संबोधन न लावता नुसत्या नावानिशी हाक मारल्यास दुखावणारी मंडळी.
२. असे संबोधन न लावण्याचा आग्रह करणारी मंडळी!
साहेब/ सर/ भाऊ/ भैय्या किंवा मॅडम/ मिस/ बहनजी शब्दालाही नाराजी व्यक्त करणारी मंडळी पाहिली आहेत.
तेव्हा ही आवडनिवड व्यक्तिसापेक्ष असते आणि तुम्ही कोणत्या वातावरणात त्या व्यक्तीला तशा प्रकारे संबोधत आहात तेही महत्त्वाचे ठरते.
मराठी किंवा भारतीय गटांचा जेवढा काही माझा मर्यादित अनुभव आहे त्यावरून एवढे नक्की सांगू शकते : व्यक्ती तितक्या प्रकृत्ती!