मी हा विषय चर्चेला ठेवण्याचं कारण असं की हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे आणि माझा अर्थ जे शांतपणे वाचतील त्यांच्या जीवनात विधायक बदल घडवू शकतो, किमान त्यांना विचाराची एक दिशा देऊ शकतो.

मला मनोगत वरच्या प्रतिक्रिया वाचून नेहेमी आश्चर्य वाटतं. मी सुरुवातीलाच सांगीतले आहे की मी माझ्या आनंदासाठी लिहीतो, मला कुणाला दुखवण्यात किंवा इतरांना कमी लेखण्यात काही एक रस नाही.

त्यातून मजा म्हणजे हे सर्व मोफत आहे तुम्हाला वाटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. 

जिथे मला गैर वाटतं (युद्ध, संगीताला बेसिक इंस्टींक्टशी जोडणं, चुकीचे अध्यात्मिक अर्थ, वैफल्या बद्दल लेखन, माझ्या लेखनाचा विषय बाजूला ठेवून ओशोंच्या जीवनावर चर्चा) तिथे मी माझी  मतं स्पष्टपणे व्यक्त करतो त्यात अनाहूत सल्ला देण्याचा काही उद्देश नसतो.

खरं तर इथे इतकी टोपण नांव आहेत की कोण केंव्हा काय म्हणाला हे लक्षात ठेवणं ही अवघड आहे आणि मूळात तो माझा स्वभाव नाही. टोपण नांवानी लिहीण्याचा बेजवाबदारपणा मी तरी करत नाही, जे चांगलं असेल त्याचं मला नेहेमी कौतुक आहे.

या दृष्टीनी या श्लोकाचा खरंच रोजच्या जगण्यात उपयोगी पडेल असा अर्थ कुणी सांगीतला तर मला आनंदच होईल.

कुठल्याही विषयाला काहीही वळण देण्यात अर्थ नाही. तरी तुमची चर्चा किंवा प्रतिसाद इथून पुढे विधायक ठेवा.

संजय