मला विचाराल तर मला काहीच फरक पडत नाही कोणीही काहीही म्हंटले तरी...

लग्ना आधी सगळीच लहान मुले ताई म्हणत असत.... आणि आमचे नातेवाईकही फारसे नसल्यामुळे विशेष नाते असल्याने तसे... म्हणजे आत्या- मावशी वगैरे म्हणणारी मंडळीही फारच कमी होती....

पण प्रेमविवाह असल्याने लग्न होण्याआधीच नवय्राच्या नातेवाईकांना अनेकदा भेटले असल्याने नवे नातेसंबंध आधीच जोडले गेले... आणि काकू, मामी अश्या संबोधनांचा आयुष्यात प्रवेश झाला...  

लग्नानंतर काही महिन्यातच माझ्या सासय्रांच्या मावस बहिणीच्या मुलीच्या- मधल्या मुलीला पुत्ररत्न प्राप्त झाले... म्हणजे माझ्या नवय्राच्या आणि पर्यायाने माझ्या भाचीला मुलगा झाला आणि वयाची सिल्वर ज्युब्ली (शब्द जिभेवर आहे पण नेमका अत्ताच आठवत नाहीये) गाठायच्या आतच मी आजी झाले आणि माझा नवरा आजोबा....   आता तो मुलगा २ वर्षाचा आहे आणि मला आवडीने आजी म्हणतो  

वयाच्या द्रुष्टीने पाहिले तर जरा जास्त वाटते,,, परंतु मला मामी, मावशी, काकू, आणि आजी म्हणणारी ही लहान पिल्लं इतकी गोड आहेत.... आणि त्यांना माझा ईतका लळा आहे की "नावात काय?" प्रमाणे "हाकेत काय?" असा विचार करून मला आता कोणीही काहीही हाक मारली तरी चालते... अगदी ३५ वर्षाच्या रिक्षावाल्याने माझ्या त्याच्या वयातले एका दशकाचे अंतर विसरून मला काकू / मावशी म्हंटले तरी...