(संजयजी क्षीरसागर यांची आधीच माफी मागतो. थोडा मिस्किलपणा चालवून घ्यावा, अशी विनंती.)
संस्कृत भाषेवर पूर्वीपासूनच आमचे प्रभुत्व असल्याने काही वाक्यांचे मराठी अनुवाद खूपच सुलभ होतात.
१) या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी
अर्थ : 'ये निशा! आता तुला जवळ यायला हरकत नाही. सगळी भुते झोपली आहेत. मी मात्र संयम बाळगून तुझ्यासाठी जागत बसलो आहे.
(लग्नानंतर दहा वर्षांनी नवऱ्याचे विचार किती सुंदर व्यक्त झाले आहेत!)
२) तमसो मा ज्योतिर्गमय.
तुझी आई ज्योतिबाला गेलीय.
३) कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषू कदाचन.
तुला अधिकार नसताना तू ही कामे करत जाऊ नकोस. (मॅनेजमेंटच्या लक्षात आलं तर) तुला कदाचित त्याची वाईट फळे मिळतील.
४) वसुधैव कुटुंबकम
माझ्या कुटुंबाचे नाव वसुधा आहे.
५) सा विद्या या विमुक्तये
त्या विद्याबाईंना मुक्ती मिळाली बरं का!
६) चराति चरतो भग:
चरचर खाण्यामुळे पोटात भगभग होऊ शकते.
७) अग्निमीळे पुरोहितं
अखेर पुरोहिताला अग्नी मिळालाच
८) यज्ञात भवती पर्जन्यः
अरेरे! नेमका यज्ञात पाऊस पडला
९) दिव्या गीर्वाणभारती
गिरणीत काम केल्याने भारतीचा अवतार दिव्य झाला होता.
१०) वयं पंचाधिकं शतम
शंभरीच्या वयात पंचा मोठाच लागतो.