रेंदाळकरांची कविता विपुल आहे. पण फारशी विविध नाही. त्याच्यात वृत्तवैचित्र्य आहे. पण वृत्तिवैचित्र्य नाही. त्यांचे विषय ठराविक होते. पण त्यांतील भाव, विचार व कल्पकत्व रेंदाळरांच्या मनात स्पष्ट असत. त्यामुळे त्यांना समर्पक शब्द सुचत.
हें पंडितांचें (कीं प्रस्तुत लेखकाचें? ) निरीक्षण आणि मूल्यमापन अफलातून आहे. असें कां असावें याचें उत्तर

रेंदाळकरांनी चरितार्थाकरिता लेखनाचा व संपादनाचा व्यवसाय पत्करला होता.

आणि
त्यामुळे त्यांचे बरेचसे लेखन 'मागणी तशी पुरवणी' या अर्थशास्त्रातील नियमानुसार आणि ही सर्व नियतकालिके हाताशी असल्यामुळे 'तळे राखील तो पाणी चाखील' या व्यवहारातील अनुभवानुसार निर्माण झाले आहे.
या ओळींत मिळतें.

तरीही ते केवळ मन न रमल्यामुळें वयाच्या विशीच्या आसपासच कुन्नूरची नोकरी सोडून सांगलीला येऊन कविता करणें सोपें जावें म्हणून संस्कृत शिकतात हें वाचून नतमस्तक झालों.

पुढे रेंदाळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कवितांचे दोन खंड प्रसिद्ध केले ते या कुंटे यानीच. कुंटे यांच्यामुळेच रेंदाळकरांची कविता महाराष्ट्रापुढे आली.
कुंटे यांना माझा प्रणाम. 

सुधीर कांदळकर