१) मी मनोगतवर जाऊन 'लेखन करावे' क्लिक करतो आणि हवे ते पर्याय निवडून येणारं पेज मिनीमाईज करून इंटरनेट बंद करतो
२) या पेज मध्ये तुम्ही आगदी मनसोक्तं लिहू शकता. मी बहुतेक वेळा आध्यात्मिक लेखन करत असल्यामुळे सगळं एका एकसंध मूड मध्ये आणि शक्यतो एका बैठकीत लिहावं लागतं कारण ते जवळजवळ मैफिली सारखं असतं. मला कोणतेही रेफरन्सेस वगैरे काढायचे नसल्यामुळे सुधारणा केवळ वाक्यरचना प्रभावी व्हावी यासाठी करावी लागते आणि थोडे शुद्धलेखन बघावे लागते, ती गोष्ट मी परत मनोगतवर जाऊन 'गमभ' नि करतो आणि तो फायनल टच असतो.
मनोगतचा फाँट आणि लेखन सुविधा इतकी सुरेख आहे की मला जे एक्सटेंपर लिहावं लागतं ते इतर सॉफ्टवेअर मध्ये जमत नाही.
३) आता प्रश्न असा आहे की (ऑफलाईन) पूर्ण झालेला लेख 'पाठवा' हा पर्याय निवडून अपलोड करताना प्रॉब्लेम आला तर संपूर्ण लेख अदृश्य होतो आणि तो माझ्याकडे सेव्ह केलेला नसतो. मनोगतच्या पेजवर केलेले लिखाण तुम्ही ऑफलाईन असताना 'सिलेक्ट करून कॉपी पेस्ट' होत नाही. जर ते अपलोड करण्यापूर्वी टेक्स्ट फाईलमधे सेव्ह करता आलं तर सगळा प्रश्न संपला कारण मग ते तिथून परत मनोगतच्या पेजवर सहज पेस्ट होतं.
प्रभंजननी सांगीतल्या प्रमाणे 'एचटीऐमएल एडीट' पर्याय ऑफलाईन उपलब्ध कसा होईल असा प्रश्न आहे
संजय