संपूर्ण अनुभव वाचताना काही तपशील वगळता पुनःप्रत्यय येत आहे असेच वाटत होते.
"डॉक्टर सांगतील ते खरे" आणि "आता डॉक्टर बिक्टर काही नको" अश्या दोन्ही प्रतिक्रिया (स्वतःबद्दल) व्यक्त केलेल्या व्यक्ती माझ्या परिचयाच्या आहेत/होत्या. निदान/उपचार चुकल्याने एखाद्याचे आयुष्य तरुण वयात नाश पावले ह्या जाणीवेने रडलेले डॉक्टरही माझ्या ऐकण्यात आहेत.
शेवटी
तर्काचे आयुध या क्षणाला तरी अगदी लहानसे, बोथट झाल्यासारखे वाटत होते.असाच अनुभव येतो हे खरे.