डॉक्टरांच्यावर नव्हता. कसाईपणा हा त्यांचा धर्म आहे, आणि त्यांनी त्या धर्माचे पालन केले इतकेच. यातला थोडा राग त्या निधन पावलेल्या स्त्रीवरही होता. इतका संपूर्ण विश्वास कुणावरही असणे बरे नव्हे, हे तिला कळायला पाहिजे होते.
अगदीं खरें वैद्यराज हरती प्राणानी च.
माझ्या पत्नीला कॅन्सर आहे मुंबईच्या टाटा इस्पितळातल्या डॉक्टरांनीं १९८८ साली बायोप्सीचा अहवाल निगेटिव्ह असतांना सांगितलें आणि रेडिओथेरपी घ्यावयास सांगितलें. कारण केस फ्री होती. आणि तिथें रेडिओथेरपी BARC देते, टाटा हॉस्पिटल नाहीं.
त्या डॉक्टरांशीं प्रचंड भांडण करून मीं सांगितलें कीं निगेटिव्ह अहवालानंतर 'कॅन्सर आहे असें तुम्हींच काय परमेश्वर म्हणाला तरी तें खोटेंच असेल' असें सांगितलें. तेव्हां त्यांनीं मला विचारलें होतें कीं डॉक्टर तुम्हीं आहांत कीं मीं. नंतर केस पेड करून डॉक्टर एम आर कामत यांचे - ते तेव्हां एस एम जोशी यांच्यावर उपचार करीत होते - उपचार सुरुं केले. त्यांनी त्याच केसपेपरवर स्पष्ट लिहिले कीं या पायरीवर कोणतेही कॅन्सरविरोधी उपचार सुरूं करतां येत नाहींत. तें मीं त्या डॉक्टरांना मुद्दाम दाखवलें व सलून काढा मी पहिलें गिऱ्हाईक असेन म्हणून ठणकावून सांगितलें. सौ अजूनही सर्व अवयवांसहित खणखणीत असून माझ्या डोक्यावर कायम बसून आहे.
असो. बरेंच अवांतर झालें लेखांतील कहाणी दुःखदायक आहे. तुमच्या दुःखांत मीही सहभागी आहे.
सुधीर कांदळकर