सुधीरजी,
१. मी टोपी उडवण्याचे समर्थन केले नव्हते. कलाक्षेत्रातही आपले स्थान निर्माण करणे/ कारकीर्द घडवणे ही कष्टसाध्य, आव्हानात्मक बाब आहे हे दर्शवणारे ते फक्त एक वस्तुस्थितीदर्शक विधान होते. तसा अर्थ निघत असल्यास क्षमस्व.
२. माझी जुजबी सांगितीक जाणकारी (आणि तितक्याच तोलामोलाची वैचारिक प्रगल्भता) माहित असूनही संजयजीनी केलेली फर्माइश लक्षात घेऊन चार शब्द लिहिले. आपली सांगितीक जाणकारी आणि प्रगल्भता दोन्ही उजव्या दिसतात. मंदारने मला गाण्याच्या साथीबद्दल लिहावे अशी फर्माइश केली आहे. माझ्या मते या विषयाबद्दल लिखाण करण्यासाठी आपण अधिक योग्य व्यक्ती आहात. तेव्हा या लेखमालेचे हस्तांतरण करून ती आपण पुढे चालवल्यास बरे होईल. तशी विनंती/ फर्माइशच केली करतो आहे असे म्हणा ना!
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
- हरिभक्त