डॉक्टरांबद्दल जे लिहिलंय्, ते फारच क्लेषदायक आहे. साध्या-सुध्या आजारावरील साध्यासुधा उपचाराची अपेक्षा ठेवून जावे नि हजारो रुपये पाण्यात घालावे लागावेत्, हा सर्वसामान्य अनुभव ठरत आहे. मागे मी एका मल्याळी मित्राकडून ऐकले होते की, केरळमधील जुने वैद्य रुग्णाला प्रथम वंदन करीत आणि मग तपाशीत. कां तर म्हणे, धन्वंतरी रुग्णाच्या रूपाने परीक्षा घेण्यास येत असतो. ही भावना आता पाहावयास मिळत नाही.
लेखातील कहाणी दुःखदायक आहे. मनातले सल लवकर जाणारे नाहीत, पण करणार तरी काय?