काही वेळा नेत्याबद्दलच्या अतीव आदरापोटी कार्यकर्ते नावाच्या पुढे-पाठीमागे संबोधनांची संपुटे जोडत जातात. तो प्रकार अर्थात मर्यादेत नसेल तर हास्यास्पद ठरतो. त्यात पुन्हा बिरुदे असतील तर मग बघायलाच नको. 'गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रियकुलावतांस सिंहासनाधीश्वर' अशी दवंडी सुरू होते. मग ते 'जाणता राजा आदरणीय शरच्चंद्ररावजी पवार' असो किंवा 'हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेजी' असो, कार्यकर्ते एका सुरात गाऊ लागतात. अहो चातुर्मासानिमित्त जैन मुनींचे आगमन होणार असेल तर त्याच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या जाहिराती बघा. अशा संपुटांची लांबलचक माळच असते.
मला इतकेच सांगायचे होते की आदर यथायोग्य असावा, पण असावा. अर्थात वरच्या प्रतिक्रियांत म्हटल्याप्रमाणे ज्याची त्याची मर्जी.