मनोगतावरून नोटपॅडमध्ये :
जेथे आपण लेख वा प्रतिसाद लिहित असतो त्या खिडकीत नेहमी प्रमाणे मजकूर लिहा.
खिडकीच्या खाली असणाऱ्या एचटीएमेल बटणावर टिचकी मारा.
आता आपला मजकूर एच टी एम एल पद्धतीत दिसू लागतो̮ (ह्या संपादनात गरज नसल्याने खिडकीच्या वरची बटणे दिसेनाशी होतात; पण खालची दिसत राहतात.)
ह्या खिडकीच्या आत आपल्या मूषकाच्या उजव्या बटणाने टिचकी मारा. जे पर्याय दिसतील त्यातून 'सिलेक्ट ऑल' निवडा. खिडकीतला सगळा मजकूर काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा मजकूर होई ल.
त्या मजकुरावर मूषकाच्या उजव्या बटणाने टिचकी मारा. जे पर्याय दिसतील त्यातून 'कॉपी' निवडा
आता तुमच्या मजकूर तुमच्या संगणकाच्या टाचणवहीत (क्लिपबोर्ड) कॉपी झालेला असेल.(तो तुम्हाला दिसणार नाही. )
आता नोटपॅड उघडा व त्याच्या खिडकीत आत जाऊन मूषकाच्या उजव्या बोटाने टिचकी मारा. जे पर्याय दिसतील त्यातून 'पेस्ट' निवडा.
आता तुमचा मजकूर (टाचणवहीतून) नोटपॅडमध्ये चिकटवला जाईल.
तो तुमच्या संगणकावर जतन करताना त्याचा आराखडा (फॉर्मॅट) यूटीएफ ८ निवडा व हव्या त्या नावाने जतन करा.
नोटपॅडमधून मनोगतावर :
नोटपॅडमध्ये वरीलप्रमाणे जतन केलेली फाईल उघडा
ती मूषकाच्या उजव्या बटणाच्या उपयोगाने कॉपी करा. (वरीलप्रमाणे)
मनोगताचा संपादक उघडा आणि तळव्यातील एचटीएमेल पर्याय निवडा. ... आता वरची बटणे दिसेनाशी होतील.
ह्या खिडकीच्या आत जाऊन मूषकाच्या उजव्या बटणाच्या उपयोगाने वर कॉपी केलेला मजकूर 'पेस्ट' करा.
आता तुमचा मजकूर मनोगतावर एचटीएमेल खिडकीत आला.
आता खिडकीच्या तळव्यातील 'डिझाईन' हा पर्याय निवडा, म्हणजे तुमचा मजकूर 'दिसे तसे वसे' (wysiwyg) स्वरूपात दिसेल.
आवश्यकतेप्रमाणे त्यात संपादन करून तो सूपूर्त करा वा वरील प्रमाणे पुन्हा जतन करून ठेवा.