... केव्हातरी मधेच जाग आली. त्याला जाणवले की कुणीतरी आपल्या अंगावर मस्त मऊमऊ पांघरूण घातले आहे. त्या रेशमी पांघरूणात झोपायला त्याला एवढे छान वाटले! वाटले की कधी उठूच नये... निघूच नये या पांघरुणाच्या बाहेर. अजून झोपही येत होती. आता अजून गाढ झोप लागली. किती वेळ झोपला तो ते बाप्पालाच माहीत! सूर्य आला नि गेला सुद्धा... चांदोबा आला नि झोपलेल्या सुरवंटाला हळूच हाक मारून गेला....

ध्वनिमुद्रित करून मुलांना ऐकवण्यासारखी भाषा.

मी  मागे असा प्रयोग केलेला होता. एका इंग्रजी बालकथांच्या पुस्तकात छोट्या छोट्या गमतीदार गोष्टी दिलेल्या होत्या. मी त्यातल्या काही भाषांतर करून माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित करून मुलाला ऐकवल्या होत्या. (मुलांना ऐकायलाही मजा वाटते आणि कितीही वेळा ऐकवता येतात! मात्र भाषा अशी त्यांच्याशी बोलल्यासारखी ओघवती हवी.)

असा किंवा इतर काही प्रयोग करून पाहण्यासारखा आहे असे वाटते.