सुन्न झालो. श्री. महेश म्हणतात त्याप्रमाणे पुनःप्रत्ययाची भावना मनात आली. माझ्या मित्राच्या एका नातेवाईकाच्या लहान मुलासोबत अगदी असा प्रसंग घडला आहे. पायाला झालेली लहान जखम चिघळली आणि बरी झाली. पुन्हा पाय दुखू लागल्याने तपासणी केली तर बोन मॅरो कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. कॅन्सरचा रोग क्रमाक्रमाने वर सरकत गेला आणि पाठीपर्यंत पोचला. 10 वर्षाच्या मुलाला केमोथेरपीच्या भयाण अनुभवातून जावे लागले. मुलगा गेल्यावर आईवडिलांना सुटल्यासारखे वाटले असेल का?
अशा प्रसंगी काय बोलावे काही सुचत नाही.