१. आपण टोपी उडवण्याचें समर्थन केलेलें नाहींच. कधीं कधीं आपल्या लेखनांतून आपल्याला अपेक्षित नसलेले अर्थ ध्वनित होऊं शकतात तेवढेच मला दाखवून द्यायचें होतें.
२. मी नक्कीच योग्य व्यक्ती नाहीं. आपल्या लेखनाची मीं तारीफच केलेली आहे. आपल्या
किर्वाणीच्या फितीत केलेली सही सही साथ, आणि इथे घेतलेली काहीशी दुय्यम, सहाय्यक भूमिका हा फरकही सहज लक्षात येईल. तबलावादकाकडे तयारीबरोबरच सांगितिक जाण आणि प्रगल्भता असावी लागते हे ही स्पष्ट होईल.
या मजकुराचें मीं समर्थनच केलेलें आहे.
लेखातील त्रुटी दाखवणें हें लेख लिहिण्यापेक्षां सोपें असते. तेव्हां लेख लिहिण्याचा अधिकार आपलाच आहे. सोपें काम माझ्यासाठीं ठेवा. माझ्या कित्येक पटीनें ज्ञान तुमच्याकडे आहे. तेव्हां अशाच आणखी लेखमाला येऊं द्यात. मीं संगीतशिक्षण कांहीं आठवड्यातच प्रथम शिक्षणनिमित्तानें आणि नंतर नोकरीनिमित्तानें सोडलें. शिवाय मध्यंतरी जवळजवळ ४० वर्षें शास्त्रीय संगीताचा तुटलेला आहे त्यामुळें बरेंच कांहीं विसरलेलों आहे. उदा नंद - मारुबिहाग किंवा सोहनी - पूरिया, कलावती - जनसंमोहिनी अशा सारख्या वाटणाऱ्या रागांतील फरक आतां मीं विसरलों आहे. तेव्हां सध्यां गफलती भरपूर करतों. तो अधिकार माझाच आहे.
सुधीर कांदळकर