ही कथा लिहिताना मला बऱ्याच अडचणी आल्या. त्यात म्हणजे शेवटचे दोन्ही भाग लिहिताना
डोळ्यांचा त्रास झाला व विजेचा असा काही लपंडाव चालू होता की विचार करून लिहिलेलं बघता बघता उडून जात असे.
तसेच ते सेव्ह केले तरी ते परत मला ते लेखन विभागात परत कसे आणायचे हे नीट माहीत नव्हते. त्याचप्रमाणे मी कथेचा
कच्चा आराखडा करीत असलो तरी टंकलेखन करताना ती विकसित करण्याची माझी सवय आहे. मेहनतीने तयार केलेलं उडून
गेल्यास परत तेच विचार सुचणं मला कठीण जातं. म्हणून काही भाग लहान असले तरी मला पाठवावे लागले. . काही भाग उत्तम लिहिला असुनही मला पाठवता आला नाही. विबाहबाह्य संबंध जरी दाखवलेले असले तरी साधारण माणसाच्या मनात
त्याबद्दल असलेलं आकर्षण मला दाखवायचे होते. सत्येन देसाईचा कामाबाबतचा चांगला भाग , कथा सांगणारा पाहत नाही,
हे मला जास्त करून दाखवायचे होते. तर त्याला तो त्याच्या कार्यालयीन प्रगतीतला स्पर्धक वाटतो. ऑफिसमधील सत्येनची
मोनॉपोली त्याला सलत राहते. असो. मी कोणताही भाग हेतुपुरस्सर उशिरा लिहित नाही. इतरही काही वैयक्तिक कारणे आहेत.
पण ती इथे लिहिणं अनुचित ठरेल. कदाचित मला स्पष्टिकरण नीट देता आलं नसेल , तर कृपया गैरसमज करून घेऊ नये.
काहीही झालं तरी आपलं मत स्पष्ट पणे लिहिल्या बद्दल आभार. आपल्या प्रतिसादांशिवाय त्रुटीही
समजणार नाहीत. यापुढे कमीत कमी भागात कथा संपविण्याचा प्रयत्न करीन. परत एकदा आभार.