राव आणि बाप होण्याचा काही संबंध नाही. कोणताही मानाने मोठा माणूस राव असू शकतो.
आर्यपासून तामीळमध्ये अय्या आणि मराठीत अहो झाले, पण जी झाले असल्याचे ऐकिवात नाही. श्रीपासून जी झाले असेल हे शक्य आहे. आपल्याकडे पोवाड्यात जी हे पादपूरणार्थी वापरतात. जी-रे-र जी-रे-र जी-जी -जी ! तिथे आदर दाखवणे वगैरेचा काही संबंध नाही.
हाँजी, हाँजी आणि जीहाँ, जीहाँ आवडले. हरियानवी हिंदी आणि लखनवी हिंदीतला हा फरक कानाने ऐकला होता पण कधी मनाला जाणवला नव्हता.