१.
नावानंतर जी लावण्याची प्रथा मराठी नसेलही, पण नागपूर आणि आसपासच्या भागात नेहमीच्या बोलण्यात 'जी' ची रांग लावतात.
उदा. 'का जी? कोठी चाल्ला जी? पहा ना जी?'
ह्याशिवाय बावाजी हा शब्द तिथे फार प्रचलित आहे. ज्येष्ठांना बावाजी संबोधण्यात येते.
२.
नंतर जी लावणे म्हणजे हांजीहांजी याशिवाय दुसरे काही नाही.
रावजी, बाळाजी, भिकाजी, दाजी, शिवाजी, संभाजी, शहाजी, तानाजी, सूर्याजी, व्यंकोजी ह्यांत नावानंतरची जी आहे ना? त्याचे काय?