अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
अलीकडे जवळ जवळ प्रत्येक वर्षी, जून किंवा जुलै महिन्यांत, पुण्याच्या पाणी पुरवठ्यामधे कपात होणार अशी बातमी कधीतरी हमखास प्रसृत केली जाते. पुण्यातले लोक कसे जास्त पाणी वापरतात, पाण्याची कशी नासाडी करतात वगैरे विषय मग मोठ्या चवीने चर्चिले जातात. मग एकदम अचानक पाऊस बरसू लागतो. तो इतका बरसतो की अगदी नकोसा होऊ लागतो. हा असा पाऊस, आठ दहा दिवस जरी बरसला तरी पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे केंव्हाच पूर्ण भरतात. इतकेच नाही तर जादा पाणी नदीत सोडायला सुरवात होते व नदीला पूर येतो. पाणी कपातीची चर्चा, पुढच्या वर्षीच्या जून-जुलै पर्यंत, केंव्हाच ...
पुढे वाचा. : पुणे आणि पाणी कपात