श्री. गंगाधरसुत

कथेचे सर्व भाग परत वाचून काढले. अश्यासाठी की मी आधीची प्रतिक्रिया दिली ती "ओव्हररिऍक्शन" होती का हे बघायला. पण सगळे भाग परत वाचल्यावरही माझे पूर्वीचे मत कायम आहे.

भाग १ आणि २ - इथे सत्येनने काहीतरी मोठा आर्थिक घोळ केला असणार. बरेच वर्षे तो कोणाच्याही लक्षात आलेला नसणार आणि शेवटी तो लेखक उजेडात आणणार अशी काही गोष्ट असावी हा अंदाज होता.

भाग ३ - वासंतीचा प्रवेश. सत्येन - वासंती रोमान्स सुरू. हेच प्रकरण अगदी ७ व्या भागापर्यंत सुरू आहे. खरे तर याचा कंटाळा यायला लागलेला आहे. गोष्ट पुढे जातच नाहीये.

फक्त चौथ्या भागात "सत्येन आयटीचा जावई" हे लेखकाला कळते इतकाच नवीनपणा.

म्हणून माझी प्रतिक्रिया होती. त्यातही आपले भाग ८-१० दिवसांच्या फरकाने येत होते आणि गोष्टही फार पुढे सरकत नव्हती म्हणून लिहिले. आपली शैली उत्तम आहे हे आधी लिहिलेच आहे.

 पण जर छोटी असती तर वाचायला मजा आली असती.

विनायक

जाता जाता - आयटी आणि सत्येन यांची वये काय असावीत? सत्येनला मुलगा - सून आहेत असा उल्लेख आहे. माझ्या लग्नाच्या वेळी माझे वय २९ आणि सासऱ्यांचे ५८ होते. सत्येन आयटीचा जावई म्हणून या हिशोबाने सत्येनचे वय ५८ आणि आयटीचे ८७ असेल. इतक्या वृद्ध अवस्थेत एमडी रोजच्या रोज कामकाजात उत्साहाने भाग घेऊ शकतो?