नको बाळगू गर्व फुका तारुण्याचा
नवी पालवी झडतच नाही... असे नव्हे
चुकलो मीही असे वाटले... वाटेला
वाट कधीही चुकतच नाही... असे नव्हे
किती काळ सोसेल चेहर्यांना तोही
पारा त्याचा चढतच नाही... असे नव्हे
गूढ, स्तब्ध, एकाकी दिसते जरी तळे
तरंग नकळत उठतच नाही... असे नव्हे
झोकुन देणे जमले की सारे जमते
जगण्याचा तळ मिळतच नाही... असे नव्हे... हे शेर एकदम बढिया आहेत, वाट आणि पारा विशेष!
-मानस६