माझा आक्षेप जालावरच्या उल्लेखाबद्दल होता. पुढच्या व्यक्तीचा चेहरा, मूळ नाव, वय माहिती नसताना, उगाच भाउ, काका, ताई म्हणजे मला तरी विचित्र वाटते. आणि जवळिक असेलही तरी ती ऑनलाईन दाखवण्यात मजा नाही. त्यासाठी ईमेल आहेतच.

म्हणजे ४० वर्षाच्या माणसाने २० वर्षाच्या तरूणीला ताई/ बाई म्हटलेलं किती स्त्रीयांना आवडेल वा उलट.

बाकी लतादीदी आणि तशी मोठी माणसं यांच्याबद्दल योगप्रभुंशी सहमत.

मात्र मनोगतासारख्या संकेतस्थळावर वय/लिंगभेद मुद्दाम दाखवणे, योग्य वाटत नाही.