(मला सर्व मनोगती मित्रांनी एकेरी नावाने संबोधलेले आवडेल.)
विजय,
तुझा मुद्दा पटण्यासारखाच आहे, पण माझाही अनुभव ऐक. अन्य एका संकेतस्थळावर एकदा एका विषयावर चर्चा सुरू होती. त्यात एका सदस्याने काही उथळ आणि चिथावणीखोर विधाने केली होती. मीही तेथे नवीनच होतो. त्या सदस्याने घेतलेले टोपणनाव एखाद्या तरुणाच्या नावाप्रमाणे वाटत होते. (म्हणजे जर सत्तर वर्षाच्या माणसाने टिल्लू हे टोपणनाव घेतले तर जसे वाटेल तसे) प्रतिसाद देताना मी जरा जास्तच कडक आणि एकेरी बोलून गेलो. नंतर तेथील अनुभवी मित्रांनी कळवले, की ते सदस्य बरेच वयस्कर आहेत. अजाणतेपणामुळे माझ्याकडून जो अनादर झाला त्याचे मला वाईट वाटले आणि मी त्यांची क्षमा मागितली. तेव्हापासून मी माझ्यापुरते एक ठरवले, की जालावर इतरांचा उल्लेख सुरवातीला नेहमी आदरार्थी आणि संबोधनानेच (उदा : जी) करायचा. पुढे त्या व्यक्तीने कळवले तरच त्याला नावाने किंवा एकेरी हाक मारायची.
वारकरी संप्रदायात सगळे एकमेकांना वाकून नमस्कार करतात. तेथे वय/जात/लिंग असा भेद केला जात नाही. मनोगतावर चालणार असेल तर आपण सगळे परस्परांना संबोधनरहित नावाने हाक मारुया.