शिवाजी-शहाजी यांच्या नावातला जी आदरार्थी आहे असे समजून अदिलशहाच्या किंवा औरंगजेबाच्या दरबारात तो गाळत असले पाहिजे. त्या काळातल्या राजाराम, तुकाराम यांना ज्याअर्थी जी लावत नव्हते त्याअर्थी  तो जी, हा, दाजी-बाजी-  हाजी(मस्तान)प्रमाणे नावाचा भाग होता.  नाहीतर  महारोग्यांची सेवा करणारे गांधींचे अनुयायी शिवाजीराव पटवर्धन, किंवा नुकतेच वारलेले प्रतिभावान वक्ते शिवाजीराव भोसले यांच्या नावातल्या जी ला आपण डच्चू दिला असता.