प्रत्येक प्रांताची, भाषेची
स्वतःची एक अदब असते.
मान्य. महाराष्ट्राची अदब मा. आणि जी लावणे ही नाही. आंध्रमध्ये नावानंतर
गारू लावतात, आपण लावू?
दरबारात मात्र त्यांचा उल्लेख
बाजीराव पेशवे आणि चिमणाजीपंत असा करत.
हेदेखील मान्य. पण उल्लेख बाजीरावजी पेशवेजी आणि चिमणाजीपंतजी असा करत नव्हते हे विसरू नये.
निजाम आणि माधवराव पेशवे एकमेकांना
भेटले तेव्हा संभाषणातही निजाम
माधवरावांना संस्कृत अदबीने 'पंडित पंतप्रधान माधवरावजी पेशवे' म्हणाला तर
माधवराव त्याला उर्दू पद्धतीने ' बंदगाने अली आला हजरत' असेच म्हणाले.
'माधवरावजी' ही संस्कृत अदब आहे हे नव्यानेच कळले. आणि निजाम माधवरावांशी
मराठीत बोलला नसणार. इथे चर्चा प्रश्न फक्त अदब दाखवण्याच्या मराठी
पद्धतीची आहे. मराठीतही राव, रावसाहेब, साहेब, पंत, भाऊ, बापू म्हणतातच,
पण निजामाप्रमाणे कुणी जी म्हणत नाही.
शंकरराव चव्हाण, नारायणराव राजहंस,
राजारामबापू पाटील, अहिल्याबाई
रांगणेकर, दुर्गाबाई भागवत, ताराबाई वनारसे, गोदूताई परुळेकर...
या मंडळींना आपण जी लावतो, की मा.? राव, बापू, बाई ही मराठी आदरार्थी
बिरुदे आहेत याबद्दल कुठे वाद आहे? वाद आहे तो मा-जी चा आणि अनोळखी किंवा
अल्पपरिचित व्यक्तींना बाबा, ताई, आजी, काकू करण्याचा.
लता मंगेशकर खरंच समोर आल्या तर ते
त्यांना काय नावाने हाक मारतील? 'काय गं
लता' असे आपण म्हणू का?
नक्कीच म्हणणार नाही; पण मा. लताजी मंगेशकरजीही म्हणणार नाही.
ओळख घनिष्ट होते तेव्हा हे संबोधनही
उरत नाही. लोक नावानेच एकमेकांना हाक
मारू लागतात.
इथेच मतभेद आहेत. हिंदीभाषक ओळख कितीही घनिष्ट झाली तरी जीजी करणे सोडत
नाही. पाळण्यातल्या बाळाला ही आप म्हणण्याची त्यांची संस्कृती आहे, ती आपली
नाही. आपण आपली संस्कृती विसरू नये.
आपल्या पुरुषांच्या नावाआधी श्रीयुत(म्हणजे शुभचिन्हांनी युक्त) लावतात,
त्यांच्याकडे श्रीमान(म्हणजे पैशाने गडगंज!). फक्त पेशव्यांच्या नावाआधी श्रीमंत
लावायचे, शिवाजी-राजारामाच्या आधी नाही. उत्तरी भारतीयांच्या सभांत
उपस्थिती माननीयांची असते आपल्या सभांत मान्यवरांची. ते मेल्यावर (अप्सरांच्या
सौंदर्याप्रमाणे) स्वर्गीय होतात, आपण किरकोळ कैलासवासी वगैरे वगैरे. हांजीहांजी
संस्कृती आपल्याकडे असती, तर आपणही रावणजी, कुंभकर्णजी म्हटले असते.