मनोगतावर चालणार असेल तर आपण सगळे परस्परांना संबोधनरहित नावाने हाक
मारुया. मनोगतावरच काय पण ऑर्कुट आणि फेसबुकवरही. आणि, हाक कशाला मारायची? केवळ संबोधनरहितच नाही तर शक्यतो विनानावांनी संबोधायचे, एवढे पुरेसे आहे. एकदा नावे घेण्याची किंवा ठेवण्याची पद्धत सुरू झाली की ती कधीकधी सत्यानाशाला कारणीभूत ठरू शकते हे सदैव मनात असू द्यावे. आपला संबंध फक्त सदस्यांच्या ज्ञानाशी, कौशल्याशी, विचारांशी किंवा प्रतिभेशी आहे. त्यांच्या नावा-वयाशी नाही. त्यांना नसता नाटकी आदर दाखवण्याचे अजिबात कारण नाही. साधे शिष्टाचार पाळले की बस्स आहे.