भाषा जेव्हा अनावश्यक आग्रही, शुष्क रोखठोक किंवा काटेरी होऊ लागते तेव्हा संवाद आटोपता घ्यावा, हे उत्तम.

समर्थ रामदासांनी रामरायाकडे जे मागणे मागितले आहे त्यात सुरवातीलाच ते काय मागताहेत? 

कोमल वाचा दे रे राम / विमलक करणी दे रे राम

प्रसंग ओळखी दे रे राम / धूर्तकळा मज दे रे राम

असो. मृदू आणि आदरयुक्त भाषेचे महत्त्व आपल्या ठिकाणी आहेच.