... खरोखरच बाजी प्रभू देशपांड्यांचे खरे नाव (म्हणजे 'नावाचे मूळ' अशा अर्थी) 'बा' ('बापू गोखल्या'तल्या 'बापू'सारखे किंवा 'बाबा कदमा'तल्या 'बाबा'सारखे) आणि दाजी भाटवडेकरांचे खरे नाव (पुन्हा 'नावाचे मूळ' अशाच अर्थी) 'दा' ('दादा कोंडक्या'तल्या 'दादा'सारखे) का असू नये?

म्हणजे, 'ते तसे नसावे' असे मानायला काही सबळ कारणे किंवा ठोस पुरावे देता येण्यासारखे असल्यास किंवा सापडल्यास खुशाल ही थियरी कचऱ्याच्या पेटीत फेकून द्यावी, माझे म्हणणे नाही. पण न तपासता सकृद्दर्शनीच ती टाकाऊ का वाटावी?

शिवाय, 'रावबाजी' = 'राव' + 'बा' +'जी' यात तीनतीन आदरार्थी पदे येत नाहीत काय? पुन्हा, कोण म्हणतो मराठ्यांत आदरार्थी पदांची माळ लावण्याची परंपरा नव्हती(च) म्हणून?