इथेच मतभेद आहेत. हिंदीभाषक ओळख कितीही घनिष्ट झाली तरी जीजी करणे सोडत नाही. पाळण्यातल्या बाळाला ही आप म्हणण्याची त्यांची संस्कृती आहे, ती आपली नाही. आपण आपली संस्कृती विसरू नये.
आपल्या पुरुषांच्या नावाआधी श्रीयुत(म्हणजे शुभचिन्हांनी युक्त) लावतात, त्यांच्याकडे श्रीमान(म्हणजे पैशाने गडगंज! ). फक्त पेशव्यांच्या नावाआधी श्रीमंत लावायचे, शिवाजी-राजारामाच्या आधी नाही. उत्तरी भारतीयांच्या सभांत उपस्थिती माननीयांची असते आपल्या सभांत मान्यवरांची. ते मेल्यावर (अप्सरांच्या सौंदर्याप्रमाणे) स्वर्गीय होतात, आपण किरकोळ कैलासवासी वगैरे वगैरे.
१०० % सहमत. दोन वर्षाच्या कालावधीत मी चांगलच अनुभवलय.
हांजीहांजी संस्कृती आपल्याकडे असती, तर आपणही रावणजी, कुंभकर्णजी म्हटले असते.
हे एकदम भारी. रामजी होतात पण रावणजी नाही.
अवांतर :- आपण (मराठी) द्रविड आहोत का ? अर्थात हा स्वतंत्र लेखाचा/ चर्चेचा विषय होउ शकतो.