सहजतेने जो उल्लेख चांगला वाटतो, तसा करावा. जसं तुम्ही वर "विजय, तुझा..." हे सहज वाटते, पण मी जर मुद्दाम तुमच्या टोपण-नावाचा (याला आणखी काही म्हणतात का? )  उल्लेख योगप्रभू काका (वा तत्सम) करणे, मला विचित्र वाटते.

असो, अनोळखी असे पर्यंत "तुम्ही" वापरायला हरकत नाही. पण मला तू म्हटलं की अधिक जवळीक वाटते. ज्यांना जवळीक नको असेल, त्यांनी तुम्ही म्हणावे, हरकत नाही.  (ह.घ्या.)

अवांतर :- श्याम पेठकर २ महिने पुण्यात काही कामानिमित्त्य होते. परत नागपुरला पोहचले तेव्हा त्यांचा एक जुना मित्र भेटला. त्याला ते म्हणाले, " यार, जरा दोन चार कडकडीत वऱ्हाडी शिव्या दे". मित्र चकीत. त्यावर ते म्हणाले, " २ महिने पुण्यात होतो, बिनामिठाची बिनामसाल्याची भेंडीची रस्स्याची भाजी खाल्ल्यासारखं झालंय"...वॉक वॉक... ह̱. घ्या.  

कदाचित हा जिथे आपण लहानाचे मोठे होतो, तिथल्या संकेताचा परिणाम असेल :-?