दीदी हा  फारसीमधून हिंदीत आलेला शब्द. (मूळ फारसी शब्द काय आहे ते चित्तरंजन सांगू शकतील, मला शोधता आला नाही. )  पण एक नक्की, की हा शब्द मराठीत कधी आलाच नाही. आणि लता मंगेशकरांशिवाय इतर कोणत्याही मराठी स्त्रीच्या संदर्भात तो वापरला गेल्याचे माहीत नाही.  बंगालात खूप दिद्या असतात, आपल्या रेल्वेमंत्री मुम्तादिदी त्यांतल्या एक.  जो मराठी नाही, तो  शब्द कुणी बंगाली संगीत दिग्दर्शकाने वापरला म्हणून आपणही आपले शब्द विसरून त्याला मान डोलवायची? मग अक्का, अम्मा, अय्यांनी काय घोडे मारले आहे?  कुणी भीमसेन जोशींना भीमण्णा म्हटलेले आपण समजू शकतो, पण बाळ ठाकऱ्यांना बाळण्णा चालेल? मराठी माणसांना मराठी बिरुदे लावावीत, उगीच उत्तरी भारतीय लाळघोटेपणा करतात म्हणून आपण करू नये.

आज अजित पवारांचा वाढदिवस आहे.  वर्तमानपत्रांची निम्मी पाने त्यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातींनी भरली आहेत. प्रत्येक जाहिरातीत त्यांच्या नावाच्या आजूबाजूला मा. ना. श्री. आणि दादा आहे. हे लांगूलचालन नाही? मराठी संस्कृतीत हे बसत नाही.