'जी म्हणजे हांजीहांजी नव्हे ती केवळ औपचारिकता आहे' इथपर्यंत ठीक आहे, पण मराठीत असली काही औपचारिकता नाही, असे म्हणता येत नाही. असं म्हणताना योगप्रभूंनी जी नावांची यादी दिलीय (मालोजी, विठोजी, शहाजी, शिवाजी, संभाजी, तानाजी, येसाजी, बाजी, चिमणाजी) ती मुस्लिम राज्यकर्त्यांची समकालीन आहेत. (जी हा शब्द फारसी किंवा उर्दूचा)
योगप्रभूंच्या मते ऐतिहासिक म्हणजे मुस्लीम आक्रमणानंतरचा भारत काय? त्याअगोदरसुद्धा भारताला इतिहास आहे हे योगप्रभूंना माहीत नसावं. मराठीतच काय पण अख्ख्या भारतात अशी औपचारिकता कधीच नव्हती.

उदाहरणंच द्यायचं झालं तर आठव्या शतकातली महाराष्ट्राच्या प्रसिद्ध राष्ट्रकुट घराण्याची ही नावं बघा. दंतीदुर्ग, अमोघवर्षा, कोट्टिगा, किंक इ. किंवा इतर भारतातील - अशोक, गुप्त कौटिल्य, पुरू, देवकी, द्रौपदी, मंदोदरी, इ.

आता जर कुणाला हिडींबाताई म्हटल्यावरच जिव्हाळा वाटत असेल तर वाटू देत बापडा.!

शंकर, नारायण, राजा राम, अहिल्या, दुर्गा, तारा, गोदावरी ही काही नवीन नावं नाहीत. ही सगळी पौराणिक नावं आहेत हे ही योगप्रभुंना माहीत नसावं.  

यांच्या नावापुढे राव, पंत, बाई, ताई, अण्णा, अक्का, बापू हे लावूनच संबोधण्याची प्रथा आतापर्यंत होती असं सांगताना ही प्रथाच मुळी अलीकडच्या फक्त तीन - चारशे वर्षापूर्विची आहे हे सांगायला ते सोयीस्कररीत्या विसरले.

लता मंगेशकर जर जुन्या काळात असती तर लता या नावानेच ओळखल्या गेली असती. सध्याच्या प्रघाताप्रमाणे लतादीदी म्हणुही, पण कळीचा मुद्दा तोच आहे, मुळात जी संस्कृती आपली नाही ती आपण का जोपासावी?