नागपूर विदर्भात आहे, वऱ्हाड़ात नाही. वऱ्हाड़ म्हणजे निजामशाहीतला अमरावती जिल्हा. तिथले शेतकरी मोठे ज़मीनदार.  शेतज़मिनींवरून कोर्टात नेहमीच़ कज़्‍ज़े दाखल व्हायचे. साहजिकच़ चांगले वकील लागायचे. त्यामुळे वऱ्हाड़ातले वकील खूप श्रीमंत असत. मराठी लघुकथां-कादंबर्‍यांत वऱ्हाड़ामधील वकिलांचा नेहमी उल्लेख यायचा.
वऱ्हाड़चे इंग्रजी स्पेलिंग बेरार असे दिसायचे. इंग्रजीत Rh चा उच्‍चार ऱ होतो. ऱिनॉसेरॉस, ऱोडेशिया, ऱाइम वगैरे.  साहजिकचे कर्‍हाड़चे जसे कऱाड़ होते, तसे वर्‍हाड़चे वऱाड़, आणि नंतर बऱाड़. म्हणून स्पेलिंग Berar. उच्‍चार बऱाऱ. पुढे मध्य प्रांतात विलीन झाल्यावर तथाकथित सी.पी. ऍंन्ड बेरार नावाचा प्रांत तयार झाला.