फार वर्षांपूर्वी मुझफ्फर हुसेननं म. टा. त लिहिलेला लेख आठवला. भारतात आपल्याला सम्राट अशोकाचा इतिहास शिकवला जातो (जो शांतताप्रेमी होता); पण विक्रमादित्याचा इतिहास किती जणांना माहिती असतो. तो शिकवायला तेवढंच प्राधान्य का दिलं जात नाही?
विजयनगर साम्राज्याबद्दलही हेच म्हणावंसं वाटतं.
शिवाजी महाराज तरी परप्रांतीय लोकांना आता माहिती असतात, पण पहिला बाजीराव? पुण्यात शनिवारवाड्यासमोरच्या बाजीरावाच्या पुतळ्याखाली एका इंग्रजी इतिहासकाराचं वाक्य आहे - बाजीरावानं नेपोलिअनपेक्षा जास्त प्रदेश पादाक्रांत केला. नेपोलिअन दोन वेळा पराजित झाला, बाजीराव एकदाही नाही!
- कुमार