दिसून येते की, महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णाचा सासरा रुक्मी, जो वऱ्हाड प्रांती राज्य करीत होता, तोही कुंपणावर बसला होता. 'कौरव-पांडव मला दोघेही सारखेच' म्हणत त्याने युद्धात कोणाच्याही बाजूने लढण्यास नकार दिला होता, म्हणे! बोटचेपी वृत्ती आमच्यात रुजली आहे, ती फार पूर्वीपासून असे दिसते. आमची अस्मिता वगैरे जी कांही मनात बाकी आहे, ती केवळ शिवाजीमहाराजांमुळे. बाकी संतसंगाचा आमच्या वृत्तीवर परिणाम झाला असावा, हा अंदाजही पटणारा आहे. गांधींचा वध माथेफिरूने केला, असे सांगत सांप्रत रोज गांधींचा वध करणारे राजकारणी, जे पैशाच्या बळावर स्वतःला जिंकून घेऊ शकतात आणि निवडून आल्यानंतर दारूच्या पार्ट्या, भ्रष्टाचार यांतच धन्यता मानतात, त्यांपासून सुटका होणे, महत्त्वाचे आहे. समाजाला पुन्हा शिस्त लावण्यासाठी लष्करी अंमलच हवा, असे वाटू लागले आहे.
उद्विग्न मनाचा प्रातिनिधिक आविष्कार असलेल्या आपल्या लिखाणाबद्दल धन्यवाद.