उचल्या,
तुम्ही खंडन चर्चेपुरते मर्यादित ठेवले असते तर अधिक बरे झाले असते. माझा अभ्यास/गृहपाठ याबाबत मतप्रदर्शन किंवा अनाहूत सल्ले देण्याचे काहीच कारण नाही. त्याचप्रमाणे 'योगप्रभूंना अमुक माहीत नसावे' वगैरे विधान हास्यास्पद तितकीच अपमानास्पदही आहेत. 'विद्या विनयेन शोभते' या वचनाला अनुसरून खरी अभ्यासाची गरज आपल्यालाच आहे, हे दिसते.
मराठी भाषेच्या विकासाच्या आणि मुस्लिम आक्रमणापूर्वीच्या काळात संस्कृत भाषा प्रचलित होती तेव्हाही आदरार्थी संबोधने आणि उपाध्या होत्या. 'आर्य' हे संबोधन अशाच अर्थाने वापरले जाई. (आर्य म्हणजे श्रेष्ठ पुरुष). स्त्रियांना 'देवी' म्हणून संबोधले जाई. तपस्व्यांना 'मुनिवर' म्हणून. खेरीज नागरी वापरात 'श्रेष्ठ' अशीही पदवी होती. संस्कृत साहित्यात विशेषतः नाटकांतील संवादात ही संबोधने पाहायला मिळतात. ब्राह्मणांना 'विप्रवर्य', 'भूदेव' म्हणून हाक मारली जात असे.
(मी आणखीही काही विविधांगी आणि पूरक माहिती देऊ शकलो असतो, परंतु चर्चा खुलवण्यापेक्षा आपण वैयक्तिक शेरेबाजीचा मार्ग पत्करला आहात. मला तेवढे खाली यावेसे वाटत नाही. शुद्ध मराठी यांना सांगितलेले आपल्यासही सांगतो. मी या चर्चेत स्वतःहून थांबलो आहे.)
मनोगतच्या संपादकांनी कृपया या प्रकारांकडे लक्ष द्यावे, ही विनंती.