प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चिंतामणी आणि संजय या व्यक्ती नाहीत. चिंतामणी आणि संजय या आपल्या प्रत्येकाच्या मनोदशा आहेत, तुम्ही स्त्री असा की पुरुष! तुमच्यातला चिंतामणी तुम्हाला सारखे प्रश्न दाखवतो आणि संजय तुम्हाला रमायला सांगतो.
संदीप (खरे) हीच गोष्ट कवितेत सांगतोः
'मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो'
स्वानंद (किरकिरे) हीच गोष्ट गाण्यातून व्यक्त करतोः
'बहेती हवासा था वो, उडती पतंगसा था वो,
छुके हमारे दिल को, कहां गया उसे ढूंढो'
मी इथे लेख लिहीतो. तुमच्यातल्या चिंतामणीला ते पटत नाही म्हणून तुम्ही खवळता. तुमच्यातल्या संजयला ते पटलं तर तुम्ही दाद देता!
संजय