प्रथमतः मी श्री विनायक यांचे तपशिलवार अभिप्राय दिल्याबद्दल आभार मानतो. आपण सत्येन व आय. टी.
यांच्या वयाबद्दल लिहिले आहे , ते बरोबरही आहे. जरी चुकलं आहे असं म्हंटलं तरी आता काय करू शकणार ? दुरुस्तीचा उपाय असल्यास
अवश्य सांगावा. यापुढे या मुद्याचा मी लिहितांना नक्कीच करी न. तरीही मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात.
                                                   आपण या कथेचा पहिला भाग पाहावा. त्यात सत्येनचं वय चाळीस बेचाळीस  'असावं ' असं म्हंटलं आहे.
ते तेवढच आहे असं म्हंटलं नाही. त्याचप्रमाणे शरीर ज्यांनी कमावलेलं आहे, ते  आणि काही लोकांना निसर्गदत्त तारुण्याचा वर असावा , असे ,
त्यांची वयं आहेत त्यापेक्षा कमी भासतात. तसच सत्येनचं वय हे विनायक गायकवाड या फारसा अनुभव नसलेल्या तरुणाने अंदाजाने
ठरवलेलं आहे. त्यासाठी त्याने कोणतेही रेकॉर्ड तपासून पाहिलेले नाही. त्यामुळे योग्य वय धरून  या गोष्टीचा विचार आपण करू शकता.
वय हा फार महत्त्वाचा भाग आहे असं  वाटत नाही . तो माणूस कसा वागतो याचं महत्त्व वाटल्याने , वयाकडे दुर्लक्ष झालं असावं. पूर्वी लग्न
लहान वयातही होत असत हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
                                                      तस च  आय. टी. च वय ८७ असुनही तो एम. डी. च्या कामात रोजच्या रोज भाग घेत होता, हे आपणास
पटत नाही असे दिसते. परंतु मी स्वतः अशा ठिकाणी काम केलं आहे तिथे असा माणूस होता. फक्त त्यांच्यापासून त्रास एवढाच व्हायचा की
ते आमच्यासारख्या तरुण (त्या वेळेला ) माणसाच्या शारिरिक थकव्या कडे (काम करून आलेल्या) तुच्छतेने पाहात असत. जणू काही
तरुण माणूस थकू शकत नाही. आपण जुने गुजराथी व्यापारी पाहा. (शिल्लक असल्यास ) त्यांची वयं दिसतात त्यापेक्षा कितीतरी जास्त
असायची. का ते कळत नाही. पण कामं उत्साहाने करतान दिसत. (आता मात्र तसे नाही ) कदाचित त्यांची जीवनशैली आजच्यापेक्षा
वेगळी असायची.      
                                                       असो. कथेच्या भागगणिक दिलेले अभिप्राय आपले स्व्तःचे आहेत. आणि मी त्यांचा वेगळा नजरिया
म्हणून नक्कीच आदर करतो. प्रतिसाद कसा यावा हे वाचकांच्या मूडवरही अवलंबून असावं असं  दिसत. वाचलेल्या आणि आवडलेल्या सर्वच
लिखाणांवर प्रतिसाद दिला जातोच असं नाही.त्यामुळे  एखाद्या लिखाणावर शून्य प्रतिसाद ही येतात. याचा अर्थ ते लिखाण कमी प्रतीचे आहे
असं म्हणणं धाडसाचं ठरेल. मला असं वाटतं , की प्रतिसाद हा वाचकाचा दृष्टीकोन आहे, व तो लेखकापेक्षा वेगळा असू शकतो. म्हणूनच
प्रतिसादाचं महत्त्व आहे. असो. आपल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार. कृपया गैरसमज करून घेऊ नये.