जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला
आपापल्या तंबूमध्ये जो तो दडाया लागला
किंवा
तशा माझ्या चुका झाल्या तसे मीही गुन्हे केले
तसे कित्येकदा मीही मला न्यायालयी नेले
ह्या ओळी अष्टाक्षरीत आहेत असे वाटत नाही. या उदाहरणांत प्रत्येक ओळीत ८ दुणे १६ अक्षरे असली तरी
पहिल्या द्विपदीत - गागालगा गागालगा गागालगा गागालगा
तर दुसऱ्या द्विपदीत - लगागागा लगागागा लगागागा लगागागा
असा लघुगुरुक्रम आहे असे वाटते. अष्टाक्षरीत असे लघुगुरुक्रमाचे बंधन नसून केवळ अक्षरसंख्येवर ८चे बंधन असते. सर्व अक्षरे गुर्वक्षरे असल्याप्रमाणे उच्चारली जातात, असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.