माझा अभ्यास कमी पडतो आहे बहुतेक. पण या तीनही रचना एकाच चालीत म्हणता येतात. (लिंबोणीच्या झाडावर, चंद्र झोपला ग बाई; अष्टाक्षरी गुणगुणण्याच्या दोन पद्धती... ) तसं बहुतांश चालींसाठी असेल तर त्यांतला फरक तांत्रिकच नव्हे का? तो फरक करण्याच्या लायकीचा आहे का?

दुसरा प्रश्न असा की अष्टाक्षरीला गणांचं बंधन नाही, इतर दोन वृत्तांना विशिष्ट बंधनं आहेत म्हणून त्यांना स्वतंत्र नावं असतील. पण त्या अष्टाक्षरी का होत नाहीत? हे म्हणजे चौरसाला, आयताला चौकोनत्व नाकारण्यासारखं आहे.