निघोनि हे (मला) थोडे जुन्या वळणाचे वाटते. बाकी सगळी कविता तशी असेल तर ते बरे वाटेल.
निघून हे मूळ रूप (कदाचित) कवितेत मात्रा जमवण्यासाठी निघूनी किंवा निघोनी असे केले जात असावे. (आणखी मात्रा हव्या असल्या तर निघुनिया आणि आणखी हव्या तर निघोनिया असेही केलेले दिसलेले आहे! )
दुसरे उदाहरण 'च' चे
जुन्या कवितेत (तोच, माझाच ऐवजी) तोचि, माझाचि ... असे खूप दिसते. मात्र हल्ली (तितके) दिसत नाही.
मला स्वतःला नव्या पद्धतीच्या काव्यात (उदा. अर्वाचीन गझल) निघून इ. जास्त बरे वाटते. (अर्थात मात्रा हव्या असल्या तर वरचा पर्याय आहेच! )
(मात्र माझा काव्यनिर्मितीचा अनुभव आणि नैपुण्य अत्यंत मर्यादित आहे हे खरेच)
बाकी काही नाही.