पहिले पेशवे : बाळाजी विश्वनाथ भट. विश्वनाथ हे अर्थात वडिलांचे नाव. हे विश्वनाथ भट, सिद्दी जोहरच्या सेवेत होते. सिद्दीची अवकृपा झाली म्हणून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली. नंतर त्यांच्या बायकोला आणि मुलांना गुलामांच्या बाजारात विक्रीसाठी उभे केले असताना, रस्त्याने जाणाऱ्या मेव्हण्यांनी पाहिले. लिलावात बोली लावून त्यांनी आपल्या बहिणीला आणि भाच्यांना विकत घेतले. न बोलता मागे चालायला सांगून घरी नेले आणि आसरा दिला. लहानग्या बाळाजीने शिवाजीला पत्र लिहून नोकरीची याचना केली. शिवाजीला त्याचे वळणदार अक्षर आणि लेखन आवडले. पुढे रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना शिवाजीने बाळाजीच्या मामाचे घर शोधायला सांगून बाळाजीला बोलावून घेतले आणि आपल्या पदरी चिटणीस म्हणून ठेवून घेतले
ही हकीकत बाळाजी आवजी चिटणीसांच्या बाबतीत वाचली आहे. या बाळाजी आवजींना संभाजीने मृत्यूदंड दिला (बहुधा शिवाजीच्या मृत्यूनंतर सोयराबाईच्या वतीने संभाजीविरुद्ध कट केला म्हणून). बहुधा त्यांचा मुलगा खंडो बल्लाळ हा संभाजी आणि राजारामाकडे चिटणीस होता. त्याच्या सहीचे असंख्य (राजारामाने वतनदारांना वतने दिल्याचे) वतनाचे कागद मिळतात असे सरदेसाईंनी लिहिले आहे.
बाळाजी विश्वनाथ १६८५ - १७०० च्या सुमारास पुण्याचा सुभेदार होता. तो मोगलांच्या वतीने सुभेदार होता असेही कुठेतरी वाचले आहे. शाहू १७०८ मध्ये परत आल्यावर तो शाहूच्या बाजूला गेला आणि शाहू पक्षाला ताराबाईविरुद्ध विजय मिळवून द्यायला मदत केली म्हणून त्याला शाहूने पेशवा केले. त्या आधी बहिरू मोरेश्वर शाहूचा पेशवा होता.
विनायक