'तोच साधू ओळखावा'पेक्षा 'तोचि साधू ओळखावा' हे नक्कीच श्रवणीय आणि गेय आहे, असे आपल्या मताचा पूर्ण आदर ठेवून म्हणावेसे वाटते. मात्र, माझाच आणि माझाचि‌ यांच्या अर्थच्छटेत किंचित फरक आहे असे वाटते. 'माझाचि'मध्ये 'झा'वर जोर आल्याने निःसंशय माझाच असा अर्थ जाणवतो. अर्थात हे ज्याचे त्याचे वैयक्तिक मत आहे.  थोडक्यात काय, कविता जुनी असो की नवी, ती नाजुक भावना व्यक्त करणारी असेल तर, शब्द कर्णमधुर असावेत आणि त्यांतून उचित भाव दिसावा, असे मला वाटते.