'तोचि साधू ओळखावा' हे नक्कीच श्रवणीय आणि गेय आहे
मान्य. मलाही ही ओळ श्रवणीय आणि गेय वाटते. आपण ती तशीच लहानपणापासून ऐकलेली आहे हेही कारण असावे.

'तेचि पुरुष दैवाचे ....' हे गाणे आणि 'तोच चंद्रमा नभात ....' हे गाणे ऐकले तर दोन्ही गेय, श्रवणीय इ. आहेत; पण पहिले उदाहरण थोडे जुने आहे. दुसरे उदाहरण (तुलनेने) नवे आहे. (तोच चंद्रमा ... मध्ये बरेच 'च' आहेत)

उदाहरण द्यायचे झाले तर मला समजा सामाजिक संगीत नाटक लिहायचे असेल आणि त्यात काही पात्रे मागच्या पिढीतील काही अगदी तरुण असेअसेल तर मी वृद्धांच्या तोंडच्या गाण्यात 'चि' वापरेन आणि तरुणांच्या तोंडच्या गाण्यात 'च' वापरेन. (अर्थात हे सगळे काल्पनिक उदाहरण आहे.)