कस्तुरबातली बा म्हणजे गुजराथीतली आई. पंचमदांमधला दा म्हणजे चक्क, बंगालीतले दादामोशाय.
मराठीतही बा आहे, पण फक्त आदरार्थी नाही. कुत्सितार्थेसुद्धा. विनोबा, बाळकोबा, खंडोबा, गोरोबा, तुकोबा आदरार्थी. पण म्हसोबा, नवरोबा, बंडोबा, थंडोबा, वाघोबा, लांडगोबा, वानरोबा, ताडोबा, नागोबा कुत्सितार्थी. तसेच बाईचे. बायकोबाई, भागूबाई, रडूबाई इत्यादी. कुणा अल्पपरिचिताला बा किंवा बाई लावायचे असेल तर तसे करण्याला कुचका वास येत नाही ना याची खबरदारी घेऊनच तसले धाडस करावे.---अद्वैतुल्लाखान