अष्टाक्षरी म्हणजे फक्त आठ अक्षरांची नव्हे हा तुमचा मुद्दा कळला. पण अष्टाक्षरी हे विशेषनाम कसं? ते जातीवाचक नाम आहे. ब्राह्मण सारखं. काही लोक ब्राह्मण जातीचे असतात तशा काही कविता अष्टाक्षरी वृत्ताच्या असतात. त्या वृत्ताचे काही गुण असतात - आठ अक्षरं, सर्व अक्षरं गुरू असल्याप्रमाणे म्हणणे, लघू गुरूचं बंधन नाही वगैरे वगैरे.
पण मी उद्धृत केलेल्या रचनांना हे गुण आहेतच, शिवाय इतर विशेष गुण आहेत. जर आधी दिलेली उपमा ताणायची तर असं म्हणता येईल - अष्टाक्षरी म्हणजे ब्राह्मण तर इतर दोन रचना म्हणजे फारतर कोकणस्थ व देशस्थ ब्राह्मण असतील. पण तेही ब्राह्मणच.