अष्टाक्षरी म्हणजे फक्त ओळीत आठ अक्षरे असणे आणि प्रत्येक अक्षराची गुरू उच्चार करणे? हे बरोबर असेल तर एखादे उदाहरण मिळाले तर बरे होईल.
जेव्हां लढाईचा...मध्ये गागालगा चारदा आले आहे. तसेच ते माधव जूलियनांच्या
मी श्यामले बंदी तुझा, वंदी तुला अभ्यंतरी ।
तू दक्षिणा दे, वा न दे, निःशब्द मी सेवा करी ॥
या कवितेत आले आहे.

तशा माझ्या चुका... मध्ये  लगागागा चारदा आले आहे, तसेच ते माधव जूलियनांच्या
भवानी आमुची आई । शिवाजी आमुचा राणा ।
मराठी आमुची आई । गनीमी आमुचा बाणा॥
या कवितेतही येते. मोरोपंत असल्या कवितेला रसना म्हणत, तर माधव जूलियनांनी  तो गज्‍जलेचा एक प्रकार आहे असे म्हटले आहे असे वाटते.

माधव जूलियनांच्या 'छंदोरचना'चा चित्त यांनी खाली दिलेला दुवा नीट उघडता आला नाही, त्यामुळे या रचनांवर अधिक भाष्य करता येत नाही.